News Flash

गोरेगावात भरधाव स्कूल बसची बॅरिकेटला धडक; क्लिनर ठार, दोन विद्यार्थी जखमी

ही दुर्घटना बुधवारी घडली असून पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भरधाव वेगाने जाणाऱ्या एका स्कूलबसने रस्त्यातील बॅरिकेटला जोरदार धडक दिल्याने क्लिनरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील गोरेगाव येथे घडली. या अपघातात दोन विद्यार्थीही जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बुधवारी घडली असून पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, उमेश गुरव (वय ३५) असे या अपघातात ठार झालेल्या क्लिनरचे नाव आहे. तर, १२ ते १४ वयोगटातील दोन विद्यार्थी यामध्ये जखमी झाले आहेत. याप्रकरणी रामजीत गौड (वय ५४) या चालकावर वनराई पोलिसांनी निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मेट्रोच्या कामासाठी गोरेगावमधील पश्चिम द्रुतगती मार्गावर बॅरिकेट्स टाकण्यात आले आहेत. ही भरधाव बस थेट या बॅरिकेट्सवरच जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे बसमधील क्लिनरला नाहक आपले प्राण गमवावे लागले.

मात्र, यामुळे स्कूलबसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 12:59 pm

Web Title: rash school bus hits barricade at mumbai cleaner killed on the spot two students injured
Next Stories
1 दोन बायका फजिती ऐका ! खर्च भागवण्यासाठी छापल्या पाच लाखांच्या बनावट नोटा, पोलिसांकडून अटक
2 आपला पाळणा कधी हलणार ?, राष्ट्रवादीची भाजपाविरोधात पोस्टरबाजी
3 सर्वोच्च न्यायालयाची लक्ष्मणरेषा ओलांडून मराठा आरक्षण
Just Now!
X