पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवेबद्दल राज्यातील अनेक पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली आहेत. त्यात मुंबईचे सहपोलीस आयुक्त सदानंद दाते आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा करण्यात आली.
पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दरवर्षी राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदाही राज्यातील अनेक पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर झाली आहेत.
मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा तसेच हेड कॉन्स्टेबल लखुजी परदेशी (मरणोत्तर) राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाले.
गुणवत्तापूर्ण सेवेचे पुरस्कार ३९ जणांना जाहीर करण्यात आले आहेत. त्यात अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरिंद्र कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक परमबीर सिंग यांचा समावेश आहे.
उल्लेखनीय सेवेचे राष्ट्रपती पुरस्कार चौघांना जाहीर झाले आहेत. त्यात मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सदानंद दाते, औरंगाबादचे पोलीस आयुक्त संजीव कुमार, दहिसरचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख तसेच पोलीस निरीक्षक मोतीराम पाखरे यांचा समावेश आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 26, 2014 3:22 am