13 July 2020

News Flash

‘सैराट’वर विनोद करणाऱयांवर टीका करणारा मेसेज नागराजच्या नावाने व्हायरल

व्हॉट्सअॅप, फेसबुक या सध्याच्या झटपट माध्यमांमध्ये कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो.

सैराट च शुटींग संपे पर्यंत मी अण्णांच्या घरीच राहिलो मग ३१ डिसेंबर ला रात्री झिंगाट गाण्याच पाहिलं कडव आलेलं त्या एकाच कडव्यावर आम्ही सर्व जन रात्र भर नाचत होतो असा पैलवानकीतून थेट हिरोगिरी करेन असे मला काय कोणालाच वाटले नव्हते.

नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटाने सध्या प्रेक्षकांना ‘याड लावलं’ आहे. चित्रपटाला सर्व स्तरांतून तुफान प्रतिसाद मिळत असतानाच चित्रपटातील पात्रांवरून विनोदांचे मेसेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक या सध्याच्या झटपट माध्यमांमध्ये कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. पण आता ‘सैराट’वर विनोद करणाऱया मेसेजेसवर टीका करणारी एक पोस्ट दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्याच नावाने व्हायरल झाली आहे. ‘सैराट’ चित्रपटावर विनोद न करण्याचे आवाहन या मेसेजमधून करण्यात आले असून, चित्रपटातील कलाकारांसह संगीतकार अजय-अतुल यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. मराठी अस्मितेचा धागा पकडून ‘सैराट’वर विनोदी मेसेज शेअर करणाऱयांवर शरसंधान या पोस्टमधून करण्यात आले आहे. अर्थात मेसेजचे स्वरुप पाहता तो नागराजच्या नावाने खपवला जात असल्याचे स्पष्ट कळून येते.

नागराजच्या नावाने व्हायरल झालेले मेसेज-

sairatpost

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 3:40 pm

Web Title: sairat nagraj manjule msg viral on social media
Next Stories
1 VIDEO: मुंबईत रुग्णालयाच्या ‘ओपीडी’मध्ये नाचगाण्याचा कार्यक्रम; चौकशीचे आदेश
2 उद्धव ठाकरे ‘रूटीन चेकअप’साठी लिलावती रुग्णालयात
3 शीनाची गळा दाबून हत्या, माफीचा साक्षीदार होण्याची श्यामवर रायची विनंती
Just Now!
X