28 November 2020

News Flash

उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. समीत ठक्करला २४ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. त्याला आज कोर्टापुढे पुन्हा हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना औरंगजेब आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पेंग्विनशी तुलना करणारे ट्विट केले होते. याप्रकरणी शिवसैनिकांच्या तक्रारीवरून मुंबईत दोन आणि नागपुरात एक गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाने २० ऑक्टोबरला अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा आरोप समीत ठक्करवर आहे. त्याला २० ऑक्टोबरला अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर त्याला २४ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती.

समीर ठक्करला अटक केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. करोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन विषाणू कधी कसे आणि कुठे निष्पाप लोकांना ग्रासतील सांगता येत नाही त्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा आणि गप्प बसा असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 2:14 pm

Web Title: sameet thakkar sent to police custody till 9th november by a court in mumbai scj 81
Next Stories
1 Mumbai Metro Carshed: “विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा ही ठाकरे सरकारची कार्यपद्धती”
2 “आपली अब्रू, जनतेचे हाल आणि तिजोरीच्या पैशांचा चुथडा सरकारनं त्वरित थांबवावा”
3 अभिनेत्री कंगना तिची बहीण रंगोली यांना मुंबई पोलिसांचं समन्स
Just Now!
X