27 November 2020

News Flash

सर्वकार्येषु सर्वदा : नवव्या पर्वाची बुधवारी सांगता

दिलीप प्रभावळकर यांच्या उपस्थितीत

(संग्रहित छायाचित्र)

दानशूरांनी ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ दानयज्ञात यंदाही घसघशीत दान टाकत सेवाव्रतींच्या कार्याला भक्कम पाठबळ दिले आहे. या उपक्रमाच्या यंदाच्या पर्वाचा सांगता सोहळा बुधवार, ३० ऑक्टोबर रोजी रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे होणार असून, त्यास ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी मदतीचे धनादेश संस्थांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात येतील.

विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून देणाऱ्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे यंदाचे नववे पर्व. या नऊ वर्षांत दानशूरांनी ९२ संस्थांना मदतीचा हात देत त्यांच्या कार्याला भक्कम पाठबळ दिले.

या उपक्रमांतर्गत यंदा गणेशोत्सवादरम्यान १० संस्थांची माहिती ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली.

दर वर्षीप्रमाणे यंदाही वाचकांनी मोठे आर्थिक पाठबळ देत विधायक कार्यासाठी या संस्थांचे हात बळकट केले आहेत. या दानयज्ञाची सांगता ३० ऑक्टोबरला समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. सोहळ्यात या संस्थांच्या प्रतिनिधींकडे मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात येणार आहेत.

कधी- बुधवार, ३० ऑक्टोबर, दुपारी ३.३० पासून

कुठे- मिनी थिएटर, रवींद्र नाटय़ मंदिर, सिद्धिविनायक मंदिराजवळ, प्रभादेवी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 12:52 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2019 presence of dilip prabhavalkar abn 97
Next Stories
1 निम्म्या राज्यात सत्ताधाऱ्यांची पाटी कोरी
2 राज्यात काँग्रेस प्रथमच पदाविना!
3 राज्यात उच्च रक्तदाब, मधुमेहाचे २७ लाख संशयित रुग्ण
Just Now!
X