शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर निवासात उभारण्यास विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांना टोले लगावत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्यांना काहीच करून दाखविता येत नाही, ते निव्वळ वाद घालत बसणारच, अशी टीका करत, राज ठाकरेंच्या विरोधास शिवसेना महत्त्व देत नसल्याचे संकेत सेना नेते सुभाष देसाई यांनी दिले आहेत. शिवसेनेचा महापौर निवासाच्या जागेवर डोळा आहे असा आरोप करून राज यांनी महापौर निवासातील स्मारकास विरोध केला होता.