अयोध्येत राममंदिर बांधल्याने करोना जाणार आहे का, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे ‘जय श्रीराम’ लिहीलेली १० लाख पत्रे पवार यांच्या निवासस्थानी राज्यभरातून पाठविली जातील, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले.
अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमीपूजन ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. पवार यांनी केलेले वक्तव्य खेदजनक असल्याने त्यांना पत्रे पाठवून निषेध करण्यात येत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 12:10 am