ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी मुंबईत वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेते रमेश भाटकर, अशोक सराफ, विजय कदम, विजय पाटकर आदी कलाकार या वेळी उपस्थित होते.
सोमवारी सायंकाळी पवार यांचे दीर्घकालीन आजाराने कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले होते. अंत्यसंस्कारापूर्वी सकाळी पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते.