News Flash

नाल्यात पडून आणखी एका बालकाचा मृत्यू

धारावीतील घटना ; गोरेगावातील नाल्यात पडलेला दिव्यांशचा अजुनही शोध सुरूच

प्रतिकात्मक छायाचित्र

गोरेगाव येथील नाल्यात पडून वाहून गेलेल्या दिव्यांश या चिमुकल्याचा अद्याप शोधही लागलेला नसताना, आता धारावी परिसरातील एका नाल्यात पडून सुमीत मुन्ना जैसवार असे नाव असलेल्या सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मुंबईत पावसाळ्यातील उघड्या गटारांमध्ये, नाल्यांमध्ये पडून मृत्यू होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. धारावीतील राजीव गांधी कॉलनी येथील पिवळा बंगला परिसरातील एका नाल्यात दुपारीच्या वेळी हा मुलगा नाल्यात पडला होता. यानंतर तो बुडत असल्याचे पाहून स्थानिकांनी त्याला बाहेर काढले व तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

गोरेगाव येथील नाल्यात पडलेला दिव्यांशचा सहा दिवस झाले तरी अद्याप पत्ता लागलेला नाही. त्यानंतर वरळी येथे देखील खड्ड्यात पडून एका मुलाचा मृत्यू झाला. अशाप्रकारच्या वाढत्या घटनांमुळे महापालिकेविरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातातवरण तयार झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 7:38 pm

Web Title: seven year old boy dies due to drowning after he fell into a drain msr 87
Next Stories
1 अनधिकृत पार्किंग: महापालिकेने सात दिवसांत वसूल केला २३ लाखांचा दंड
2 महापौरांची गाडी नो पार्किंगमध्ये, सर्वसामन्यांना दंड ठोठावणारी पालिका काय कारवाई करणार ?
3 मुंबईत स्वाईन फ्लूचा पहिला बळी, २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू
Just Now!
X