शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर बोचऱ्या शब्दांत टीका करणाऱ्या ‘लोकसत्ता’मधील ‘नालायकांचे सोबती’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
सत्तेत भारतीय जनता पक्षासोबत भागीदारी करतानाच सरकारवरील टीकेची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. मात्र, ज्या सरकारला ते आपल्या भाषणांमधून नालायक ठरवितात त्याच सरकारमध्ये आपलेही मावळे आहेत, हे ते विसरतात. ११ एप्रिलला प्रकाशित झालेल्या या अग्रलेखात नेमक्या या विरोधाभासावर बोट ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना या अग्रलेखावर आपली भूमिका मांडायची आहे. आज गुरुवापर्यंत आपले मत नोंदविता येईल. indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
Gaurav Gogoi alleges that BJP wants a Russian-style oligarchy
“रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप
congress candidates
राहुल आणि प्रियांका गांधींमुळे अमेठी आणि रायबरेलीची उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात; काँग्रेसमधील संभ्रमाचे कारण काय?