Untitled-33

खुलेपणाने मांडा तुमची मते
‘लोकसत्ता’ने ‘ब्लॉग बेंचर्स’ या विलक्षण उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. जे विद्यार्थी अवांतर वाचन करतात, ते यात सहज सहभागी होऊ शकतात. मात्र विद्यार्थी किंवा वयोगट यापुरती स्पर्धा मर्यादित न ठेवता ती सर्वासाठी खुली करावी. अग्रलेखाबरोबर दैनिकातील इतर विशेष लेखांचाही स्पर्धेसाठी विचार करावा. स्पर्धेतील विषय प्रामुख्याने चालू घडामोडींशी निगडित असल्याने विद्यार्थ्यांना अद्ययावत राहण्यास मदत मिळेल. तसेच संपादकीय लेखणीचा-विचारांचा जवळून अभ्यास करता येईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मत बनवावे आणि ते व्यक्त करण्यास प्रोत्साहन मिळेल. सध्या विद्यार्थी समाजमाध्यमांच्या जाळ्यात असले तरी हा वापर वैयक्तिक काम अर्थात ‘चॅटिंग’ आणि माहितीची देवाणघेवाण यापुरताच मर्यादित आहे. पण, ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धा त्यांना वैचारिक प्रगल्भतेसाठी प्रवृत्त करेल, असा विश्वास वाटतो. सर्वागीण विचार करणारे विद्यार्थी लक्षात घेऊन स्पर्धेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याकडे व्यवस्थापन प्राधान्यक्रमाने लक्ष देईल.
– डॉ. सुहास बी. धांडे
(प्राचार्य, के. आर. सपकाळ कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्, अंजनेरी)

स्पध्रेत सहभागी होण्यासाठी..
* स्पध्रेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी सुरू झाली असून त्यासाठी
www. loksatta.com /blogbenchers या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी झाल्यावर विद्यार्थी स्पध्रेत सहभागी होऊ शकतात.
* ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहे. लिखाणातील मुद्दे, त्यांची वैचारिक समज आदींच्या आधारे दर आठवडय़ास दोन विद्यार्थ्यांचे निबंध निवडले जातील.
* यातील पहिल्या निबंधाला सात हजार, तर दुसऱ्या क्रमांकाच्या निबंधाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
* ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर व मुख्य अंकात प्रसिद्धी दिली जाईल. विजेत्यांना त्यांच्याच महाविद्यालयात समारंभात प्राचार्याच्या हस्ते पारितोषिक दिले जाईल.
अधिक माहितीसाठी वाचत राहा ‘लोकसत्ता..’