ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा कौल भावनांच्या आधारेच दिला. भावना भडकावणारा प्रचार अप्रामाणिक असतो आणि त्यास मिळणारे यशही तात्पुरते असते; परंतु त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते. ‘ब्रेग्झिट’मुळे ग्रेट ब्रिटनमध्ये उलथापालथी होतीलच; पण यामुळे युरोपीय संघावरही प्रश्नचिन्ह लागेल, असे मत मांडलेल्या ‘अंतारंभ’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

मुळातच खंगलेली जागतिक अर्थव्यवस्था आता कुठे डोके वर काढेल अशी चिन्हे असताना हा घटस्फोट घडून आला, तो युरोपीय संघ या स्वप्नाच्या अंताचा आरंभ ठरेल असे विश्लेषण या अग्रलेखात करण्यात आले आहे. या अग्रलेखावर पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल.

विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.