22 February 2020

News Flash

राज्य संसदीय समन्वय समिती अध्यक्षपदी अरविंद सावंत

समितीचे अध्यक्ष सावंत यांचे कार्यालय नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात असेल

मंत्रिपदाचा दर्जा

मुंबई : राज्यातील विविध प्रस्तावांचा केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील खासदारांची बैठक झाली होती. त्यामध्ये केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यात आली होती. या प्रस्तावांचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबतचा शासन आदेश शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला.

समितीचे अध्यक्ष सावंत यांचे कार्यालय नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात असेल. त्यांना आवश्यक सुविधा तसेच अधिकारी-कर्मचारी नवी दिल्लीतील सचिव, निवासी आयुक्त हे महाराष्ट्र सदन यांच्याकडून देण्यात येणार आहेत.

First Published on February 15, 2020 1:36 am

Web Title: shiv sena mp arvind sawant named chairman of maharashtra parliamentary panel zws 70
Next Stories
1 न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा राजीनामा
2 दहिसर भूखंड प्रकरण : सहा पोलिसांवर खटल्याची ‘सीबीआय’ला परवानगी
3 वैद्यकीय अभ्यासक्रमाला आता दहा वर्षांची कालमर्यादा