25 January 2021

News Flash

गरजूंसाठी ५ रुपयांत शिवभोजन थाळी

प्रत्येक जिल्ह्य़ात थाळीच्या संख्येत पाचपट वाढ

संग्रहित छायाचित्र

तालुकास्तरावर दररोज एक लाख उपलब्धता; तातडीने नवी केंद्रे

करोनामुळे  निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर, विद्यार्थी उपाशी राहू नयेत यासाठी शिवभोजन थाळी योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. शिवभोजन थाळी आता १० रुपयांऐवजी फक्त ५ रुपयांत देण्यात येणार आहे. राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांनी दिली.

प्रत्येक जिल्ह्य़ात थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शहरी भागासाठी प्रति थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रति थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा सवलतीचा पाच रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार करण्यात येत असून तालुकास्तरावर शिवभोजन केंद्रे सुरू करण्यासाठी १ एप्रिलपर्यंत विलंब न करता जिल्हाधिकारी आणि नियंत्रक शिधावाटप यांनी आपापल्या जिल्ह्य़ांत तातडीने निव्याने शिव भोजनालय सुरू करावीत असे आदेश देण्यात आले आहेत .त्याचबरोबर शिवभोजनाच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.

शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज र्निजतुक करणे आवश्यक आहे. भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे, त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकामध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ाबाबत २४ तास मदतकार्य

नागरिकांना रास्त भाव दुकानावर साहित्य न मिळणे, बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ाबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री कार्यालयामार्फत तात्काळ निरसन केले जात आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या  पुरवठय़ाबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरूपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरिकांना साहाय्य मिळवून देण्यासाठी तक्रारदारांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  संतोषसिंग परदेशी (खाजगी सचिव)- ९८७०३३६५६०, अनिल सोनवणे (विशेष कार्य अधिकारी)- ९७६६१५८१११, महेंद्र पवार (विशेष कार्य अधिकारी)- ७५८८०५२००३, महेश पैठणकर (स्वीय साहाय्यक)- ७८७५२८०९६५.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2020 12:49 am

Web Title: shiva bhojan plate for needy at rs 5 abn 97
Next Stories
1 समाजमाध्यमांवरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई
2 राज्यातील ३५ करोनाबाधित रुग्ण बरे
3 काळ्या बाजारात मद्य उदंड; हातभट्टी जोरात!
Just Now!
X