02 March 2021

News Flash

खडसेंना ईडी नोटीस पाठवण्यावरुन संजय राऊत संतापले; म्हणाले…

"ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही..."

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवली जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसे यांनीदेखील इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आपल्याला नोटीस येणार असल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

युपीएकडे मोदींसारखे नेतृत्व आणि अमित शाह यांच्यासारखे राजकीय व्यवस्थापक नाहीत – शिवसेना
ईडीच्या नोटीशीवर एकनाथ खडसेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

संजय राऊत यांनी यावेळी सामना संपादकीयवरही भाष्य केलं. सामना संपादकीयमधून युपीएला चिमटे काढण्यात आले असून युपीएकडे मोदींसारखे नेतृत्व आणि अमित शाह यांच्यासारखे राजकीय व्यवस्थापक नाहीत अशी टीका केली आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “युपीएची ताकद वाढणं गरजेचं आहे. युपीएमध्ये जास्तीत जास्त पक्ष आणि नेत्यांनी एकत्र येऊन जी हुकूमशाही सुरु आहे त्याच्याविरोधात उभं राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा आवाज उठवला पाहिजे. विरोधी पक्ष कमजोर होणं म्हणजे देशातील लोकशाही संपण्यासारखं आहे”.

शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “या देशात सोनिया गांधींच्या बरोबरीने शरद पवार एक असं नेतृत्व आहे ज्यांना देशात मान्यता आहे. त्यामुळे त्यांचाही विचार होऊ शकतो”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 11:01 am

Web Title: shivsena sanjay raut on ed notice to eknath khadse upa saamana sgy 87
Next Stories
1 बेरोजगारांना परदेशात नोकरीसाठी साहाय्य
2 भीमा कोरेगाव येथे अभिवादन सभांवर बंदी
3 विद्यापीठाचे दुसरे सत्र जानेवारीपासून; उन्हाळी सुट्टी केवळ १३ दिवसांचीच
Just Now!
X