सोन्याची तस्करी करणारे विमानतळावर अटक टाळण्यासाठी नेहमीच वेगवेगळया कुल्पत्या लढवत असतात. सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या कचाटयातून सुटण्यासाठी या तस्करांकडून जे मार्ग अवलंबले जातात ते पाहून थक्क व्हायला होते. सर्वसामान्य माणूस कल्पनाही करु शकणार नाही अशा पद्धतीने ही तस्करी चालते. सोनं पोटात लपवण्यापासून ते अंतर्वस्त्रात दडवून आणण्याचे या तस्करांचे प्रयत्न याआधी उघड झाले आहेत.

गुरुवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोबाइल फोनमधून सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी उधळून लावला. बाबूलाल सोलंकी असे आरोपीचे नाव आहे. त्याने मोबाइलच्या मागच्या भागात सोन्याची बिस्कीटे लपवली होती. सीमा शुल्क अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आल्यानंतर तपासणीसाठी सुरु केली.

त्यावेळी त्याच्याजवळ असणाऱ्या मोबाइलमध्ये सोने आढळले. त्याच्या बॅगमध्ये एकूण तीन मोबाइल फोन होते. या तिन्ही मोबाइलमध्ये तीन किलो सोन्याची बिस्किटे होती. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत ८७ लाख ५० हजार आहे.