News Flash

खंडाळ्यानजीक एसटी उलटून १८ जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळानजीक रविवारी एसटी बस उलटून झालेल्या अपघातात १८ प्रवासी जबर जखमी झाले.

| November 24, 2014 02:32 am

खंडाळ्यानजीक एसटी उलटून १८ जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळानजीक रविवारी एसटी बस उलटून झालेल्या अपघातात १८ प्रवासी जबर जखमी झाले. जखमींवर खोपोली येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाडीचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. सोलापूर येथून ठाण्याकडे जाणारी ही बस भोर घाटातील अंडा पॉइंट या ठिकाणी आली असता हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी गाडीमध्ये ५५ प्रवासी होते. या अपघातामुळे जुन्या महामार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जखमींना तातडीने खोपोली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2014 2:32 am

Web Title: st bus accident near khandala 18 injured
Next Stories
1 ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक रघुवीर नेवरेकर यांचे निधन
2 तंत्रशिक्षण संचालनालयातील ‘त्या’ पदोन्नतींना आव्हान
3 ‘दुधाचे दर कमी करा’
Just Now!
X