निर्जंतुकीकरण शुल्क, कच्च्या मालाची दरवाढ यांचा परिणाम

मुंबई : हवाई वाहतुकीवर असलेले निर्बंध, कु रिअर सेवेचे वाढलेले दर, करोनाची भीती, या सगळ्या परिस्थितीचा परिणाम महाराष्ट्रातून परदेशात पाठवल्या जाणाऱ्या फराळावरही होत आहे. कच्च्या मालाची दरवाढ आणि निर्जंतुकीकरण शुल्क यांमुळे फराळाचा परदेश प्रवास काहीसा महागला आहे. शिवाय फराळ पोहोचण्यास अपेक्षित कालावधीपेक्षा अधिक वेळ लागत आहे.

शिक्षण किं वा नोकरीनिमित्त परदेशात राहणाऱ्या मराठी नागरिकांसाठी त्यांचे नातेवाईक महाराष्ट्रातून फराळ पाठवतात. दादरच्या ‘फॅ मिली स्टोअर्स’मधून फराळाचे २०० ते ३०० खोके  दरवर्षी अमेरिका, इंग्लंड, दुबई, कॅनडा येथे रवाना होतात. मात्र, यावर्षी मागणी काहीशी कमी झाल्याचे फॅ मिली स्टोअर्सचे अभिजीत जोशी सांगतात. हवाई वाहतुकीचा खर्च प्रतिकिलो ६०० रुपये येत होता. यावर्षी १०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे फराळाची किं मतही १० ते १५ टक्क्यांनी वाढली आहे. ४८ ते ७२ तासांत पोहोचू शकणारा फराळ आता सहा दिवसांनी पोहोचत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

‘चांदेकर स्वीट्स’च्या राजेंद्र खांबकर यांच्याकडे परदेशात पाठवण्यासाठीच्या फराळाला यावर्षीही चांगली मागणी आहे. पण तिथे कोविड कर आकारला जात असल्याने प्रत्येक किलोमागे २०० रुपये खर्च वाढल्याचे आणि त्यामुळे फराळाच्या किमतीत चार टक्यांची वाढ झाल्याचे खांबकर सांगतात. ठाण्याच्या ‘माम्ज किचन’चे मिहीर धारप यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ते पाच किलोचा संच असेल तर प्रतिकिलो ९०० ते १००० रुपये कु रिअरचा खर्च येई. यंदा यात ५० रुपयांची वाढ झाली आहे. ३-४ दिवसांऐवजी ७-८ दिवसांनी फराळ पोहोचत आहे. माम्ज किचनने गेल्यावर्षी फराळाचे ११० संच पाठवले. यंदा मात्र ८० ते ८५ संचच पाठवले आहेत.

यंदा व्यवसाय कमी

पुण्याचे अरविंद अभ्यंकर गेली काही वर्षे आपल्या मुलांसाठी परदेशात फराळ पाठवत होते. परदेशातील सर्वच भारतीयांना फराळ मिळावा यासाठी त्यांनी एक संके तस्थळ तयार के ले. मात्र कु रिअर सेवेचे दुपटीने वाढलेले दर, निर्जंतुकीकरणासाठी प्रतिकिलो १५० रुपये शुल्क आकारणी या कारणांस्तव त्यांनी यावर्षी फराळ पाठवलाच नाही. चिंचवडचे अमेय किणीकर दरवर्षी अमेरिका, दुबई, फ्रान्स या देशांमध्ये २ हजार किलो फराळ पाठवतात. यावर्षी त्यांचा २५ टक्के च व्यवसायच झाला आहे.