शिवसेना-भाजपमध्ये संघर्षांची चिन्हे
मुंबईकरांच्या मदतीसाठी सदैव सज्ज असणाऱ्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या नव्या १६ अग्निशमन बंबांच्या लोकार्पण सोहळ्याचे श्रेय भाजपला मिळू नये याची काळजी घेत शिवसेनेने दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनाच या कार्यक्रमापासून दूर ठेवण्या तयश मिळविले. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये होऊ घातली आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ‘एकला जरो रे’ भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांची बांधणी सुरू झाली असून परस्परांना शह-काटशह देण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. त्याचबरोबर पालिकेच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यावरुन उभय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. याचाच प्रत्यच अग्निशमन दलाच्या १६ अग्निशमन बंबांचो लोकार्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. राजशिष्ठाचारानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठा नेता या कार्यक्रमाला उपस्थित राहता कामा नये याची काळजी पालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजते.
अग्निशमन बंबाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे, अशी भाजपच्या नगरसेवकांची इच्छा होती. तसा योगही जुळून येण्याची चिन्हे होती. अग्निशमन बंब लोकार्पण सोहळ्यास देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्यास उत्सूक आहेत, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून महापौर स्नेहल आंबेकर यांना पत्र पाठविण्यात आले होते. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत महापौरांनी या पत्राचे उत्तरच पाठविले नाही.

‘हॅझमेंट’लवकरच
दहशतवाद्यांच्या रडारावर असलेल्या मुंबईच्या संरक्षणासाठी हझार्डस मटेरियल अप्राटस (हॅझमेंट) व्हेईकल घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून ते लवकरच अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होईल, अशी घोषणा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी यावेळी केली.