News Flash

सुधीर पटवर्धन, शिल्पा कांबळे यांना पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

चित्रकार सुधीर पटवर्धन व नव्या पिढीतील तरुण लेखिका शिल्पा कांबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

चित्रकार सुधीर पटवर्धन व नव्या पिढीतील तरुण लेखिका शिल्पा कांबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘दया पवार स्मृती पुरस्कारां’ची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समकालीन चित्रकार सुधीर पटवर्धन व नव्या पिढीतील तरुण लेखिका शिल्पा कांबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरण सोहळा येत्या २० सप्टेंबर रोजी नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम) येथे संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते पटवर्धन व कांबळे यांना पुरस्कार प्रदान केले जाणार असून लेखक संजय पवार व चित्रकार सुधाकर यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली.

सुधीर पटवर्धन यांनी महानगरी जीवनजाणिवा, कामगार, कष्टकरी, वंचित सर्वसामान्य माणसांचा आपल्या अनोख्या चित्रशैलीतून वेध घेतला आहे. ५५व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात त्यांना सन्मानचिन्ह मिळाले आहे. तर ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या पहिल्याच कादंबरीने मराठी साहित्यात आपली ओळख निर्माण करणाऱ्या शिल्पा कांबळे आयकर विभागात अधिकारी पदावर काम करतात. सुभाष भेंडे नवोदित लेखक पुरस्कारासह अन्य काही पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. दया पवार स्मृती पुरस्कार या आधी प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, गंगाधर पानतावणे, शाहीर विठ्ठल उमप, दिनकर गांगल, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड, भीमराव पांचाळे, डॉ. जब्बार पटेल, शाहीर संभाजी भगत, नागराज मंजुळे तसेच अन्य मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 4:06 am

Web Title: sudhir patwardhan and shilpa kamble get padmashree daya pawar memorial award
Next Stories
1 रस्तेकामांची रखडपट्टी
2 विकासकांकडून झाडांची विनापरवाना कत्तल
3 ९ हजार इमारतींचा पुनर्विकास आवश्यक
Just Now!
X