आयसीसी टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना गुगल अनोख्या पद्धतीने साजरा करत आहे. यासाठी गुगलने डुडलमध्ये क्रिकेट चाहते, गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू अशी चित्रे त्यावर तयार केली आहेत. त्याचबरोबर, बॅट, चेंडू आणि स्टम्प्सचाही समावेश यात करण्यात आला आहे. गुगल नेहमीच डुडलद्वारे वाढदिवस, सण, उत्सव साजरे करत असतो. त्यातच अनेक मुद्दे डूडलवर मांडण्यात येत असतात. यापूर्वी ऑलिम्पिकचे गुगल डुडल बनविण्यात आले होते आणि आता टी-२० वर्ल्डकपच्या निमित्ताने हे डुडल बनविण्यात आले आहे.