News Flash

दोन वर्षांनी शिक्षक पात्रता परीक्षा

दरवर्षी साधारणपणे सात ते आठ लाख शिक्षक टीईटी देतात.

१५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान आयोजन

मुंबई : राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी ‘प्रवेश पात्रता परीक्षे’चे (महाटीईटी) आयोजन १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. दोन वर्षांनी ही परीक्षा होते आहे.

याआधी २०१८-१९मध्ये ही परीक्षा झाली होती. दरवर्षी साधारणपणे सात ते आठ लाख शिक्षक टीईटी देतात. दोन वर्षांनी परीक्षा होत असल्याने सुमारे १० लाख शिक्षक परीक्षा देतील असा अंदाज आहे. राज्यभरात २० ते २५ हजार प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या पदांवरील भरतीकरिता टीईटी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 12:08 am

Web Title: teacher eligibility test after two years akp 94
Next Stories
1 रत्नागिरीत उर्दू भवन आणि संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र
2 मुंबईतील ‘जिना हाऊस’च्या जागेवर सांस्कृतिक केंद्र उभारा; अमित शाह यांच्याकडे मागणी
3 मुंबई एअरपोर्टचं मुख्यालय गुजरातला हलवणार ही अफवा: ‘अदानी’चं स्पष्टीकरण
Just Now!
X