News Flash

मुंबई कुडकुडली..!

राज्यभरात तापमापकाचा पारा घसरत असताना मुंबईकरांनाही बुधवारी मोसमातील सर्वात थंड दिवसाची अनुभूती आली.

पारा ११ अंश सेल्सिअसवर ल्ल मोसमातील सर्वात थंड दिवस
राज्यभरात तापमापकाचा पारा घसरत असताना मुंबईकरांनाही बुधवारी मोसमातील सर्वात थंड दिवसाची अनुभूती आली. मुंबईतील तापमान ११.६ सेल्सिअसपर्यंत घसरले. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यातील या दशकातील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी तापमान आहे! जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात थंडी अधिक वाढण्याचा अनुभव असल्याने यानंतरच्या काळातही पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात मुंबईत थंडीचा कडाका वाढत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. गेले चार दिवस तापमानात सातत्याने घट सुरू होती. बुधवारी तापमापकातील पारा आणखी खाली सरकला. सांताक्रूझ येथे ११.६ तर कुलाबा येथे १७.४ अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. यापूर्वी २७ डिसेंबर २०११ रोजी ११.४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान कमी झाले होते. त्यानंतर चार वर्षांत डिसेंबरमध्ये तापमान एवढे कमी झाले आहे. किमान तापमानात घसरण होत असली तरी त्यामानाने कमाल तापमानात फारशी घट झालेली नाही. त्यामुळे दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात सुमारे १७ ते १८ अंश सेल्सिअसचा फरक पडत आहे. बाष्पयुक्त हवेत तापमानात फारसा फरक होत नाही. मात्र सध्या उत्तरेकडून येणारे कोरडे थंड वारे अधिक प्रभावी असून सापेक्ष आद्र्रतेचे प्रमाण ३० टक्क्य़ांहूनही कमी झाले आहे. त्यामुळे तापमानात एवढा फरक दिसत आहे.

सर्वात थंड दिवस :
२२ जानेवारी १९६२- ७.४0 से.
डिसेंबरमधील सर्वात थंड दिवस: २० डिसेंबर १९४९- १०.६0 से.
या दशकातील सर्वात
कमी तापमान
८ फेब्रुवारी २००८ – ८.५0 से.
१० फेब्रुवारी २०१२ – ८.८0 से.
राज्यातील सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये ६ अंश से. नोंदले गेले. डहाणूमध्ये १६.५ अंश से, पुण्यात ९.८ अंश से., नागपूरमध्ये १८ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 3:24 am

Web Title: temperature decrease in mumbai
Next Stories
1 मुंबईत रेडी रेकनर दरात सरसकट वाढ नाही!
2 गेल्या वर्षी १५ टक्के शुल्कवाढ केलेल्या शाळांना यंदा वाढ नाही!
3 मुंबईकर खोकल्याने त्रस्त
Just Now!
X