05 March 2021

News Flash

ड्रोनद्वारे मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

ड्रोन उडवण्यावर बंदी....

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. पुढच्या काही दिवसात दिवाळीचा सण आहे. दिवाळी हा मुंबईतला मोठा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी मुंबईकर मोठया प्रमाणावर घराबाहेर पडतात. यावेळी वर्दळीच्या, गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष्य करु शकतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईत छोटया ड्रोन उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या काळात मुंबईमध्ये सुरक्षा बंदोबस्त देखील वाढवला जाऊ शकतो. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम १८८ अतंर्गत कारवाई होऊ शकते.

सध्या संपूर्ण देशात अनलॉकचा फेज सुरु आहे. करोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. गर्दीमध्ये करोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांना मास्क घालण्यासह सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन वारंवार यंत्रणांकडून केले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:14 pm

Web Title: terrorist could target mumbai police announced on high alert dmp 82
Next Stories
1 आरामदायी प्रतीक्षालयासाठी फक्त १० रुपये
2 Coronavirus : ‘बेस्ट’मधील ५० कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू
3 पश्चिम रेल्वेवर आणखी ४ महिला विशेष लोकल?
Just Now!
X