— राजू परुळेकर

सणावारी, रस्त्यावर जनतेचे रक्षण करण्यात व्यस्त असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याचे जीवनच रस्त्यावर आले आहे. हाडांच्या कर्करोगाने ग्रस्त असलेला हा पोलीस हतबल झाला असून आमचेही रक्षण कोणी करेल का? असा सवाल त्याने केला आहे. राजेश पाटोळे (वय ४४) असे या पीडित पोलिसाचे नाव असून तो पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे. सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर तैनात राहणारे पाटोळे आज कर्करोगाशी झुंज देत आहेत. रक्षणकर्त्या पाटोळे यांना कोणीतरी वाचवावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील समता नगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले राजेश पाटोळे (वय ४४, रा. मीरारोड) यांना सफरीं हाडाचा केसर या आजाराने पीडित आहेत. पाटोळे यांची परिस्थिती पहाता त्यांचे कुटुंबियांच्या मदतीच्या अपेक्षेत आहेत. पाटोळे याना मुलुंडच्या वोक्हार्ट फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात  आलेले आहे.

त्यांच्या आजारावर तब्बल १० लाखाचा खर्च येणार आहे. ६० हजार रुपयांचे एक इंजेक्शन असा एक महिन्याचा कोर्स त्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. हा अवाढव्य खर्च येणार कुठून या चिंतेने पाटोळे कुटुंब सध्या चिंताक्रांत आहे. मात्र सहकारी आणि पोलीस कर्मचारी मित्र परिवार यांनी वर्गणी काढून पाटोळे कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात म्हणून केवळ दीड लाखाची मदत केली.

मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजेश पाटोळे याना दोन मुली आहेत. एक मुलगी महाविद्यालयीन बारावीत शिकत आहे. तर दुसरी चिमुरडी चौथ्या इयत्तेत शिकत आहे. २६ वर्ष पोलीस सेवेत योगदान देणारे राजेश पाटोळे हे हवालदार पदावरून पोलीस नाईक झाले आहेत. पाटोळे हे सेशन न्यायालयात काम शोधण्यासाठी गेले असताना पडल्याने त्यांनी रुग्णालयात उपचार घेतले. तब्बल ८ महिने उपचार सुरु होते. त्यावेळी त्यांना हाडे ढिसूळ झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पाटोळे हे बोरिवली कोर्टात कामासाठी आल्यानंतर तोल गेल्याने पडल्याने त्यांचा आजार बळावला.

त्यांना हाडाला मर लागल्याने त्यांना सफरींन हाडाचा कॅंसर झाला. त्यामुळे पाटोळेंना आलू  वोक्हार्ट फोर्टीज रुग्णालयात उपचार घेत आहेत. १० लाखाचा खर्च पोलीस मित्रमंडळींचे दीड लाखाचे अर्थ सहाय्य त्यातच वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून आणखीन अतिरिक्त आर्थिक मदत मिळणार आहे. पण उर्वरित रक्कमेचे काय? या प्रश्नाच्या गर्तेत पाटोळे कुटुंब अडकलेले आहेत. आज रुग्णालयात उपचार घेणारे राजेश पाटोळे यांना या आजाराच्या गर्तेतून आर्थिक मदत देत बाहेर काढणाऱ्या जीवन रक्षकाची खऱ्या अर्थाने गरज आहे. लोकांच्या रक्षणासाठी खारू ताईचा वाटा का होईना उचलणाऱ्या पाटोळे यांचेच जीवन वाचविण्यासाठी कुणी मदतीचा हात देईल काय? असा टाहो फोडित आहेत.