प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात पारितोषिक वितरण

उत्कृष्ट गणेशमूर्तीची निवड, देखावे, सजावट यासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती देण्याची वेळ आली आहे. ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१८’ चा मानाचा ‘मुंबईचा राजा’ गुरुवारी जाहीर होणार आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. यावेळी विजेत्यांना रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल.

‘जीवनगाणी’निर्मित ‘गणराज रंगी नाचतो’ आणि विविध नृत्याविष्कार हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल. यावेळी अनेक नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत. नामांकन मिळालेल्यांना आणि स्पर्धेत सहभाग घेतलेल्यांना या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश मिळेल.

‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ आणि ‘रिजेन्सी ग्रुप’ या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. स्पर्धेचे बँकिंग पार्टनर ‘अभ्युदय को-ऑप. बँक लिमिटेड’ आहेत, तर स्पर्धा बेडेकर अ‍ॅण्ड सन्स, मिलसेन्ट, चितळे घी, इंडियन ऑईल, पितांबरी यांच्यातर्फे ‘पॉवर्ड बाय’ आहे. स्पर्धेचे रेडिओ पार्टनर ‘रेड एफएम ९३.५’ आहेत.

‘मुंबईचा राजा’ पारितोषिक पटकावणाऱ्या मंडळाला रुपये ५१,००१ रोख , मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. रिजेन्सी ग्रुप पर्यावरणस्नेही मंडळाला १५,००० रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. याशिवाय भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) पर्यावरणस्नेही मूर्तिकार (रुपये २५०० रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र), विभागवार पारितोषिके (रुपये १५,००१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र), सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शन (रुपये २,५०१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र), सवरेत्कृष्ट संहिता लेखन (रुपये २,५०१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र), सवरेत्कृष्ट मूर्तिकार (रुपये २,५०१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र) पारितोषिके देण्यात येणार आहेत. पर्यावरणाचे भान राखून आणि कल्पकतेने उत्सव साजरा करणाऱ्यांचा कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे.

कधी?

४ ऑक्टोबर, संध्याकाळी ६.३० वाजता

कुठे?

रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी