याचिका उच्च न्यायालयाकडून निकाली

काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याबाबतच्या तपासावर देखरेख ठेवण्याची गरज नाही, असे स्पष्ट करत याबाबत दाखल याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली.

संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात ही याचिका केली होती. तसेच त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची आणि कारवाईची मागणी केली होती. न्यायालयाने याचिका दाखल करून घेत कृपाशंकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही महिन्यांपूर्वीच या प्रकरणी सिंह कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल केले.  न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मात्र असे असले तरी न्यायालायने तपासावर देखरेख ठेवण्याची विनंती केली होती. न्यायालयाने याप्रकरणी देखरेख ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत याचिका निकाली काढली.