देशाचा २०२१-२२ सालचा अर्थसंकल्प हा अनेकांगाने अभूतपूर्व आणि महत्त्वाचा धोरण दस्तऐवज ठरणार आहे. महसुली बाजू करोना टाळेबंदीमुळे लंगडी पडलेली आणि साथीच्या मुकाबल्यासाठी खर्च वारेमाप अशी परिस्थिती असताना, अर्थसंकल्पातून आगामी नियोजनाचा लेखाजोखा कसा असेल, याचा वेध येत्या गुरुवारी, २८ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमातून घेतला जाणार आहे.

अर्थसंकल्पापूर्वी होत असलेल्या या विश्लेषणातून, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि प्रसिद्ध अर्थविश्लेषक मंगेश सोमण हे १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून होणाऱ्या संभाव्य तरतुदी आणि घोषणांचा पट वाचकांपुढे खुला करतील. पुनीत बालन ग्रुप आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सह-प्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता-विश्लेषण’ कार्यक्रमाचे स्टोरीटेल अ‍ॅॅप हे पॉवर्ड बाय सहयोगी आहेत.

तब्बल ४५ वर्षांनंतर देशाच्या अर्थवृद्धी दर प्रथमच शून्याखाली जाईल, असे भाकीत रिझव्‍‌र्ह बँकेसह सर्वच प्रतिष्ठित अर्थसंस्थांनी व्यक्त केले आहे. तथापि, अर्थव्यवस्थेने सकारात्मक कलाटणी घेणेही फार दूर नसल्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा आशावाद आहे. रब्बी पिकांच्या पेरणीत झालेली वाढ पाहता, यंदा भरघोस पिकाचा दिलासा अर्थव्यवस्थेला मिळण्याचाही अंदाज आहे.

दूरचित्रसंवाद माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमात, वाचकांनाही आपल्या शंका व प्रश्न मांडण्याची संधी मिळेल. सहभागासाठी  https://tiny.cc/Ls_BudgetVishleshan_2021 येथे नोंदणी आवश्यक.

* सहप्रायोजक : पुनीत बालन ग्रुप, लोकमान्य मल्टिपर्पज

को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

* पॉवर्ड बाय : स्टोरीटेल अ‍ॅप