News Flash

शहरात आगीच्या तीन घटना

गेल्या २४ तासांत पश्चिम उपनगरात तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. या तीन घटनांमध्ये मिळून एकूण २५ झोपडय़ा जळून राख झाल्या.

| April 18, 2015 04:19 am

गेल्या २४ तासांत पश्चिम उपनगरात तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. या तीन घटनांमध्ये मिळून एकूण २५ झोपडय़ा जळून राख झाल्या.
गुरुवारी रात्री सांताक्रुझ येथील एअर इंडिया वसाहतीत एका खोलीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत खोलीतील सामान जळून राख झाले. शुक्रवारी पहाटे गोरेगाव पूर्व येथील संतोषनगरच्या नानुमामा कंपाऊंडमध्ये आग लागली. या आगीत एकूण २३ झोपडय़ा जळून राख झाल्या.  सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दीड तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.पहाटेच्या सुमारास मालाडच्या खडकपाडा येथे लागलेल्या आगीत दोन झोपडय़ा जळाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 4:19 am

Web Title: three fire incidents in mumbai
Next Stories
1 ‘मी नारायण राणेंना वांद्रेची निवडणूक न लढण्याची विनंती केली होती’
2 मुंबई विद्यापीठात रेल्वेशी निगडीत अभ्यासक्रमांना लवकरच सुरूवात
3 सेनेची पळता भुई थोडी करू-राणे
Just Now!
X