News Flash

ठाण्यातील पतपेढी दरोडाप्रकरणी तीन संशयितांना अटक

घोडबंदर रोडवरील धनसंचय नागरी सहकारी पतपेढीवर पडलेल्या दरोडय़ाप्रकरणी पोलिसांनी शनिवारी तीन संशयितांना अटक केली

| August 12, 2013 02:52 am

घोडबंदर रोडवरील धनसंचय नागरी सहकारी पतपेढीवर पडलेल्या दरोडय़ाप्रकरणी पोलिसांनी शनिवारी तीन संशयितांना अटक केली. जगतबहादूर मानबहादूर सौध (३८) असे यातील एकाचे नाव आहे.
धनसंचय पतपेढीमध्ये शनिवारी पहाटे दरोडा पडला होता. ही पतपेढी कासार वडवली पोलीस ठाण्यासमोरील देवसिद्धी इमारतीच्या तळमजल्यावर असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. शटरची कडी उचकटून पतपेढीतील सुमारे ३ लाख ४५ हजारांची रोख रक्कम चोरटय़ांनी लांबवली होती. चोरीची माहिती मिळताच पोलिसांच्या गस्ती पथकाने जगतबहादूर सौध यास अटक केली. त्याच्याकडून साडेचार हजार रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी अन्य दोन संशयितांना पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 2:52 am

Web Title: three suspects arrested in thane indigenous bank robbery
Next Stories
1 मिलन सब-वेवर दृश्यप्रतिबंधक यंत्रणा
2 पुन्हा एकदा स्वाइन फ्लू
3 डॉक्टर आहेत, पण नियुक्त्याच नाहीत!
Just Now!
X