20 September 2020

News Flash

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी झाडांवर कुऱ्हाड

लोअर परळ परिसरातील ना.म. जोशी मार्गावरील वृक्ष हटवले

लोअर परळ परिसरातील ना.म. जोशी मार्गावरील वृक्ष हटवले

दक्षिण मुंबईतील लोअर परळ परिसरातील ना.म. जोशी मार्ग आणि वरळीतील अपोलो मिल येथील बोरिचा मार्गावरील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या झाडांना अखेर हटवण्यात आले आहे. या दोन्ही रस्त्यांवर तब्बल सात झाडे होती. आधीच मेट्रोच्या कामांमुळे वाहतूक कोंडी होत असताना या रस्त्यांवरील झाडांमुळे या वाहतूक कोंडीत अधिक भर पडत होती. त्यामुळे या सर्व झाडांना हटवण्यात आले आहे.

डिलाईल पूल पुनर्बाधकामासाठी बंद असणे आणि ‘मेट्रो’सह सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वरळी, लोअर परळ येथील वाहतूक कोंडीचा अभ्यास करत जी/दक्षिण विभागातील वाहतुकीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये ४ महत्त्वाच्या मार्गामध्ये असलेल्या झाडांचा परिणाम वाहतुकीवर होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण समितीच्या पूर्वपरवानगीने वाहतुकीला अडथळा ठरणारी ७ झाडे शनिवारी हटवण्यात आली आहेत. या ७ झाडांपैकी सक्षम असणाऱ्या ३ झाडांचे वरळी स्मशानभूमी परिसरात पुनरेपण करण्यात आले आहे, तर उर्वरित ४ झाडे ही बाधित होती.झाडे हटविल्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती ‘जी दक्षिण’ विभागाचे साहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिली आहे.  दीपक टॉकीजजवळ असणारी ना. म. जोशी मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी ४ झाडे हटविण्यात आली आहेत. याच झाडांपैकी २ सक्षम झाडांचे पुनरोपण करण्यात आले आहे. ही झाडे हटवण्यात आल्याने ना. म. जोशी मार्गासह सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गोखले मार्ग इत्यादी मार्गावरील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास जैन यांनी व्यक्त केला आहे.

बोरिचा मार्ग मोकळा

अपोलो मिल कंपाऊंडजवळ असणाऱ्या ६० फुटी बोरिचा मार्गावर रस्त्यावरच असणाऱ्या ३ झाडांमुळे ६० फुटी रस्त्यापैकी केवळ २० फुटांचाच रस्ता प्रत्यक्ष वाहतुकीसाठी खुला होता. मात्र ही झाडे हटविल्यामुळे हा ६० फुटी रस्ता प्रत्यक्ष वापरास खुला झाला असल्याचे देवेंद्र जैन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 12:29 am

Web Title: traffic jam in mumbai 5
Next Stories
1 रोगापेक्षा इलाज भयंकर
2 आरबीआय आणि सरकार यांच्यातली बैठक समाप्त, अनेक मुद्द्यांवर सहमती-सूत्र
3 सलमानचा नंबर द्या नाहीतर ठार करेन, सलीम खान यांना धमकी
Just Now!
X