29 September 2020

News Flash

लोकल बंद पडल्याने हार्बर वाहतूक विस्कळीत

पनवेलहून वडाळ्याला जाणारी लोकल गाडी नेरूळ स्थानकात बंद पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक बुधवारी काही काळ विस्कळीत झाली होती. सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास बंद पडलेली

| December 27, 2012 04:10 am

पनवेलहून वडाळ्याला जाणारी लोकल गाडी नेरूळ स्थानकात बंद पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक बुधवारी काही काळ विस्कळीत झाली होती. सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास बंद पडलेली ही गाडी साडेआठ वाजेपर्यंत सुरू न झाल्याने अखेर ही लोकल सानपाडा कारशेडमध्ये हलवण्यात आली.
पनवेलहून वडाळ्याला जाणारी लोकल सकाळी ७.५० वाजता नेरूळ रेल्वे स्थानकात बंद पडली. या गाडीत तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. मात्र गाडी सकाळी साडेआठ पर्यंत नेरूळ रेल्वे स्थानकातच उभी होती. अखेर ही गाडी सानपाडा कारशेडमध्ये पाठवण्यात आली. मात्र ही गाडी एकाच जागी तब्बल एक तास उभी असल्याने त्याचा परिणाम इतर गाडय़ांच्या फेऱ्यांवरही झाला.
परिणामी कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले. मात्र एकही फेरी रद्द न झाल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2012 4:10 am

Web Title: transportation desterbed due to harbour local failed
टॅग Harbour,Railway
Next Stories
1 माहीम सिग्नल बिघाडप्रकरणी दोघे निलंबित
2 लग्नाचे आमिष दाखवून दोन तरुणींवर बलात्कार
3 भूमिअभिलेख, पालिका कर्मचाऱ्यांवर हल्ला
Just Now!
X