News Flash

घरावर झाड कोसळून भिवंडीत मायलेक ठार

भिवंडी येथील खोणी-खाडीपार परिसरातील भारतनगरमध्ये गुरुवारी रात्री ७० वर्षांपुर्वीचे वडाचे झाड घरांवर कोसळून झालेल्या अपघातात माय-लेक ठार, तर दहा जण जखमी झाल्याची घटना घडली.

| July 26, 2014 05:54 am

भिवंडी येथील खोणी-खाडीपार परिसरातील भारतनगरमध्ये गुरुवारी रात्री ७० वर्षांपुर्वीचे वडाचे झाड घरांवर कोसळून झालेल्या अपघातात माय-लेक ठार, तर दहा जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात ११ घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
भारतनगरमधील एका वस्तीत राहणाऱ्या अनिसाखातून अन्सारी (२०) आणि त्यांचा मुलगा मोहम्मद रजा (५ महिने) या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. शबाना अफताब अन्सारी, मन्नाबी शेख, सईदा नसीर शेख, हिना मेहबूब शेख, दौलतबी सलीम शेख, रुबा मोहम्मद, रमनिरू मेहबूब अन्सारी, रनाबी खान, जाफरा अन्सारी, अफताब अन्सारी अशी जखमींची नावे आहेत. भारतनगर वस्तीत रमजाचा महिन्या असल्याने रात्री रोजा सोडल्यानंतर जेवणाची मोठी लगबग सुरु होती. त्याचवेळी वस्तीतील वडाचे झाड ११ घरांवर अचानक कोसळून हा अपघात घडला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घरात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेले. इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 5:54 am

Web Title: tree falls 10 injured woman and infant killed
Next Stories
1 बहिणीला अपशब्द वापरल्याच्या वादातून हत्या
2 लोकलच्या धडकेत दोघांचा मृत्यू
3 आयुक्तांच्या घरासमोर ‘मनसे वडापाव’
Just Now!
X