मुंबई : समाजमाध्यमांवरून सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात अग्रेसर असलेल्या अभिनेत्री कंगना राणावतचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. नियमांचे सातत्याने उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल कंगनाने प्रक्षोभक विधाने के ली. याबाबत चित्रफीतही तिने प्रसृत केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरने म्हटले आहे. कंगनाने मात्र  ट्विटरवरच वर्णद्वेषाचा आरोप केला. आपल्याकडे मते मांडण्यासाठी इतर अनेक माध्यमे आहेत, असेही तिने म्हटले आहे.

चित्रपट क्षेत्रातील आपल्या सहकाऱ्यांपासून ते शेतकरी आंदोलनातील सहभागींपर्यंत अनेकांवर कं गनाने याआधी ट्विटरवरून टीकास्त्र सोडले. कंगनाच्या आक्षेपार्ह मजकुराबद्दल तिला समज देत   काही काळ तिचे ट्विटर खाते बंद करण्यात आले होते. मात्र कं गनाच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही. कंगनाने पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या  हिंसाचारानंतर पंतप्रधान मोदी यांना उद्देशून एक ट्वीट के ले. ‘हे अतिशय भयंकर आहे. अशा गुंडगिरीला मात देण्यासाठी आपण महा गुंडगिरी करायला हवी. ती मोकाट सुटलेल्या राक्षसीसारखी आहे. मोदीजी तुम्ही २०००च्या सुरुवातीला जसे विराट रूप घेतले होते तसे रूप धारण करून तिला धडा शिकवा’, अशा आशयाचे ट्वीट कं गनाने के ले होते. या ट्वीटबरोबर तिने एक चित्रफीत प्रसृत केली होती. त्यात लोकशाहीचा खून झाला असल्याचे सांगत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही तिने के ली होती.

कंगनाने के लेले ट्वीट हे द्वेष पसरवणारे आणि इतरांना दूषणे देणारे असून ट्विटरच्या नियमांनुसार असे प्रक्षोभक ट्वीट करणाऱ्यांवर कारवाई के ली जाते, असे सांगत ट्विटरने कं गनाचे खाते कायमस्वरूपी बंद के ले आहे. यापूर्वी कं गनाची बहीण रंगोली हिनेही प्रक्षोभक मजकूर प्रसृत केल्याने तिचेही ट्विटर खाते बंद करण्यात आले होते.