News Flash

एमटीएनएल वाहिनीच्या खड्डय़ात पडून दोन कामगारांचा मृत्यू

गोरेगावमध्ये ही घटना घडली.

गोरेगाव परिसरात एमटीएनएल वाहिनीच्या खड्डय़ात पडून मंगळवारी दोन बिगारी कामगारांचा मृत्यू झाला. अरुणकुमार पटेल (४०) आणि मनोज भोलानाथ गोस्वामी (४२) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.

गोरेगाव परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर हब मॉलसमोर मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. हे कामगार एमटीएनएल वाहिनीच्या चेंबरमध्ये त्यांचे कामाचे साहित्य लपवून ठेवत. नाल्यावर असलेले हे चेंबर सुमारे सहा फुटांहून अधिक खोल असून त्यात तीन फूट पाणी होते. या कामगारांनी नेहमीप्रमाणे साहित्य घेण्यासाठी चेंबरचे झाकण उघडले होते. एक कामगार साहित्य घ्यायला चेंबरमध्ये उतरला. मात्र बराच वेळ उलटूनही त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी त्याचा शोध घेण्यासाठी दुसरा कामगारही चेंबरमध्ये उतरला. मात्र तोही त्या खड्डात पडला.

परिसरातील नागरिकांनी याबाबत माहिती देताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या कामगारांना बाहेर काढले. त्यांना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. यातील एक कामगाराचे भंगाराचे दुकान होते. तर दुसरा मिळेल ते काम करीत असे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 9:23 am

Web Title: two workers dead while working mumbai goregaon mtnl jud 87
Next Stories
1 खातेवाटपाचा पेच सुटेना!
2 करबुडव्यांच्या मालमत्तांचा लिलाव
3 मुंबई-पुणे मार्गावरील पॅसेंजर गाडय़ा १५ जानेवारीपर्यंत रद्द
Just Now!
X