‘लोकसत्ता गप्पा’मध्ये उस्ताद राशिद खान

मुंबई : अभिजात संगीताबरोबरच ‘याद पिया की आए’ यासारख्या ठुमरीवर आपल्या स्वरांची नाममुद्रा उमटविणारे उस्ताद राशिद खान या प्रतिभावंत कलावंताशी संवाद साधण्याची संधी शुक्रवारी (१९ जुलै) ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात रसिकांना लाभणार आहे.

Marathi Actress Prajakta Mali glamorous photoshoot viral
“नुसता जाळ अन् धूर…”, प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस, म्हणाले, “हाय गर्मी”
caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..

स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांनी ‘भारतीय अभिजात संगीताचे भविष्य’ अशा शब्दांत राशिद खान यांचे कौतुक केले होते. एवढेच नव्हे तर पुण्यात होणाऱ्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवातही उस्तादजींना आमंत्रण दिले होते. त्या वेळी उपस्थित रसिकांनी त्यांना भरभरून दाद दिली होती.

शास्त्रीय संगीतक्षेत्रात ज्यांचे नाव मोठय़ा आदराने घेतले जाते असे उस्ताद गुलाम मुस्तफा खान हे राशिद खान यांचे मामा. त्यामुळे अगदी बालवयापासून स्वरांच्या सान्निध्यात राहिलेल्या राशिद खान यांच्यावर नकळतपणे संगीताचे संस्कार झाले. ज्या काळात राशिद खान यांनी संगीत शिक्षणाचा प्रारंभ केला तो काळ संगीतासाठी बहराचा होता. नव्या माध्यमांचा उदय झालेला नसल्यामुळे त्यांना साधनेसाठी पुरेसा अवधी लाभला. त्यातून राशिद खान यांची रससिद्ध गायकी आकाराला आली. शास्त्रीय संगीताचा मूलभूत पाया पक्का असल्याने संगीतामध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची संधी त्यांना लाभली आणि रसिकांनीही त्याचे स्वागत केले.

प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे या कार्यक्रमात उस्तादजींशी

संवाद साधणार आहेत. ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात विविध क्षेत्रांत नाममुद्रा उमटविणाऱ्या कलावंत, साहित्यिकांशी गप्पा मारण्याची संधी रसिकांना लाभली आहे. आपल्या प्रतिभेने एखाद्या क्षेत्रात  भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीबरोबर होणारा संवाद हा नेहमीच संपन्न अनुभव असतो.

प्रायोजक

‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक एम. के. घारे ज्वेलर्स असून पॉवर्ड बाय महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी), तन्वी हर्बल्स आणि इंडियन ऑइल आहे. कार्यक्रम निमंत्रितांसाठीच आहे.