देशावर करोना विषाणूचं संकंट असल्यामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण या समस्येमुळे हैराण झाला आहे. त्यातच या काळात अभिनेता वरुण धवनने त्याच्या जवळची व्यक्ती गमावली आहे. वरुणच्या मावशीचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत वरुणने ही माहिती दिली.

वरुणने त्याच्या मावशीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सोबतच कॅप्शनमध्ये गायत्री मंत्र लिहिला असून लव्ह यू मासी असंही म्हटलं आहे. वरुणच्या मावशीचं नेमकं निधन कशामुळे झालं हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर कलाविश्वातील अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

दरम्यान, सोनम कपूर, मलायता अरोरा, नुशरत भरुचा, दिया मिर्झा या सारख्या अनेक सेलिब्रिटींनी वरुणच्या पोस्टवर कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. वरुण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्यामुळेच त्याने त्याचं हे दु:ख ही चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.