भटक्या, पाळीव प्राण्यांसाठी सुविधा; सर दोराबजी टाटा ट्रस्टवर जबाबदारी

मुंबई : मुंबईमधील भटक्या आणि पाळीव कुत्र्यांसह अन्य जनावरांच्या शुश्रूषेसाठी महालक्ष्मी येथे सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून या रुग्णालयाची उभारणी सर दोराबजी टाटा ट्रस्टमार्फत करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सुधार समितीने मंगळवारी मंजुरी देताना मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाळीव प्राणी आणि जनावरांसाठी अशी रुग्णालये उभारण्याची सूचना प्रशासनाला केली.

lowest water stock in Mumbai lakes
मुंबईच्या पाणीसाठयात दिवसेंदिवस घट; जलसाठा २२.६१ टक्क्यांवर, कपातीबाबत पालिकेची चालढकल 
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
govandi shatabdi hospital marathi news
मुंबई: गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल
Director of Rosary School
पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हजर

राज्य सरकारने केलेल्या १९ व्या पशुगणनेनुसार मुंबईमध्ये एक लाख ९५ हजार ४४८ पाणी प्राणी असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये श्वान, म्हशी, गुरे, शेळ्या, मेंढय़ा, डुक्कर, गाढव, कोंबडय़ा आदींचा समावेश आहे. पशुगणनेमध्ये ३५ हजार ५७२ पाळीव श्वान आणि ९५ हजार १७४ भटके श्वान आढळून आले आहे.  ६९ हजार २३९ भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. उर्वरित २५ हजार ९३३ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आलेले नाही. परिणामी गेल्या चार वर्षांमध्ये भटक्या श्वानांची संख्या एक लाखांनी वाढली आहे. त्याचबरोबर पाळीव श्वानांचे प्रजनन आणि पिल्लांची विक्रीबाबतचा व्यवसाय काही मंडळी करीत आहेत. त्यामुळे पाळीव श्वानांची संख्या ८० हजारांवर पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे.

पाळीव आणि भटक्या श्वानांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली असून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या दवाखान्यांची संख्या मात्र कमी आहे. ही बाब लक्षात घेऊन महालक्ष्मी येथील आर्थर रोड कारागृहाच्या पाठीमागे श्वान आणि जनावरांसाठी सुसज्ज असे पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबवली होती. निविदा प्रक्रियेमध्ये १०० पैकी ७६.७५ टक्के गुण मिळवणाऱ्या दोराबजी टाटा ट्रस्टची या रुग्णालय उभारणीसाठी नियुक्ती केली, तसेच पालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही याबाबतच्या प्रस्तावाला २ जुलै रोजी प्रशासकीय मंजुरी दिली. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या मंगळवारच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. मुंबईत ठिकठिकाणी भटके आणि पाळीव श्वान आणि जनावरे आहेत. त्या सर्वानी महालक्ष्मी येथील रुग्णालयात उपचारासाठी आणणे शक्य होणार नाही. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी अशा प्रकारची रुग्णालये सुरू करावी, अशी एकमुखी मागणी नगरसेवकांनी बैठकीत केली होती.

रुग्णालयात सुविधा काय?

मुंबईमध्ये २०० खासगी पशुवैद्यकीय दवाखाने आणि बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेंन्शन ऑफ क्रूएल्टी टू अ‍ॅनिमल (बीएसपीसीए) या संस्थेचे एक खासगी रुग्णालय आहे. आता महालक्ष्मी येथे पालिकेचे पशुवैद्यकीय रुग्णालय उभे राहणार आहे. या रुग्णालयात आंतररुग्ण विभागासह शल्यचिकित्सा विभाग, औषधशास्त्र कक्ष, गायनॅकॉलॉजी कक्ष, अपघात- आपत्कालीन कक्ष, अतिदक्षता विभाग, कर्करोग कक्ष, त्वचाविकार कक्ष, गॅस्ट्रो डिस्टेंपर कक्ष, बारुग्ण विभाग, एमआरआय रेडिओलॉजी, सीटी स्कॉन सेंटर, सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी, एन्डोस्कोपी, परमाणू इमेजिंग, डायलिसीस सेंटर, रक्तपेढी, पॅथोलॉजी, जनावरांसाठी स्वयंपाकगृह, रुग्णवाहिका, शवदाहिनी, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह आदी उपलब्ध होणार आहेत. या रुग्णालयामध्ये जखमी, आजारी भटक्या श्वानांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत, तसेच दारिद्रय़रेषेखालील व्यक्तीच्या पाळीव प्राण्यांच्या उपचारासाठी शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.