४८ तासात मुंबई, पुणे आणि नाशिक या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. रविवारी मुंबईतला सर्वात उष्ण दिवस नोंदवला गेला, कारण रविवारी मुंबईत पारा ४१ अंशावर होता. याआधी २०११ मध्ये १७ मार्चला मुंबईचे तापमान ४१.३ अंशावर गेले होते. तर सोमवारीही उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण झाले होते. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सोमवारीही पारा ४० अंशांच्या वर होता. मुंबई नाशिक आणि पुणे या तिन्ही शहरांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे मार्च महिना संपतानाच लोकांना उन्हाच्या झळा बसत आहेत. याच बाबत लोकसत्ता ऑनलाइनचा खास रिपोर्ट पाहुया या व्हिडिओच्या माध्यमातून-