दहावी-बारावीनंतर करिअर निवडीच्या महत्त्वाच्या टप्प्यात विद्यार्थी-पालकांना मदतीचा हात देण्यासाठी ‘लोकसत्ता’मध्ये  सोमवार, १४ एप्रिलपासून ‘मार्ग यशाचा’ ही लेखमालिका सुरू होत आहे. दोन महिने सुरू राहणाऱ्या या लेखमालिकेत पदवी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसोबतच करिअरसाठी पूरक ठरणाऱ्या अल्पकालीन महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमांचीही सविस्तर ओळख करून देण्यात येईल.
‘मार्ग यशाचा’ या लेखमालिकेत कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांसोबत करिअरच्या नव्या संधींचाही मागोवा घेण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांच्या माहितीसोबत हे अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या नावाजलेल्या शिक्षणसंस्था, प्रवेशप्रक्रिया, अर्हता, अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा, शुल्क आदी आवश्यक माहितीचा प्रत्येक लेखात समावेश असेल. वैद्यक, अभियांत्रिकी विद्याशाखांसोबतच नवनव्या विद्याशाखांचा परिचय आणि त्यात निर्माण होणाऱ्या करिअरच्या विविध पर्यायांची ओळख विद्यार्थी-पालकांनी व्हावी, हे या लेखमालिकेचे उद्दिष्ट आहे.