News Flash

‘डीजेची गरज आपल्याला, गणपतीला नाही’, पारंपारिक गणेशोत्सव साजरा करा : मुख्यमंत्री

हे सर्व आपल्या उत्साहासाठी असलं तरी या उत्सवातील पारंपारिक वाद्यांचा उत्साह हा डीजे-डॉल्बीपेक्षा चांगला असतो. त्यामुळे पारंपारिक वाद्ये वाजवणे योग्य आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या वर्षा निवासस्थानी बसवलेल्या श्री गणेशाचे विसर्जन करताना.

गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बी वापरले जात आहेत. याची गणपतीला नव्हे, तर आपल्यालाच गरज असते. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायला हवा, अशी भुमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. ‘वर्षा’ या आपल्या निवासस्थानी श्री गणेशाचे विसर्जन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना डीजेला अप्रत्यक्षपणे विरोधच दर्शवला.

मुंबई हायकोर्टाने यंदा गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये पर्यावरणाला हानिकारक असल्याचे सांगत डीजे वाजवण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे राज्यात सध्या वाद सुरु आहे. कोर्टाच्या या निर्णयाला अनेक गणेश मंडळांनी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, गणपतीला डीजे आणि डॉल्बीची गरज नसून ती आपल्यालाच भासते. यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदुषण होतं. मात्र, हे सर्व आपल्या उत्साहासाठी असलं तरी या उत्सवातील पारंपारिक वाद्यांचा उत्साह हा डीजे-डॉल्बीपेक्षा चांगला असतो. त्यामुळे पारंपारिक वाद्ये वाजवणे योग्य आहे. मात्र, लोकांच्या उत्साहात कमतरता यावी असं माझं मत नाही. मात्र, निसर्ग आणि पारंपारिक उत्सवांचाही आपण विचार करणे गरजेचे आहे.

आपल्याकडील उत्सव हे निसर्गाची पुजा करणारे आहेत. दुर्दैवाने यातील नैसर्गिकता आपण घालवत आहोत. ईश्वराची पुजा करणे म्हणजे निसर्ग पूजा असते, आपली शक्तीपीठे ही निसर्गातच वसली आहेत, म्हणऊन निसर्गाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे.

विसर्जन मिरवणूकांदरम्यान वारंवार ध्वनीप्रदुषण होत असल्याने डीजे आणि डॉल्बी सिस्टिम्सला परवानगी देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. यासंदर्भात डीजे मालकांच्या पाला संघटनेने कोर्टात धाव घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 5:34 pm

Web Title: we have need dj not the ganpati chief minister appealed to celebrate ganesh utsav in a traditional way
Next Stories
1 माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन
2 पुण्यात रिमोटवर चालणाऱ्या कारमधून निघाली गणपतीची विसर्जन मिरवणूक
3 विसर्जन मिरवणुकीत महापौरांना महसूलमंत्र्याच्या बॉडीगार्डकडून धक्काबुक्की
Just Now!
X