पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांद्रे ते माहिम स्थानकांदरम्यान पॉईंट फेल्युअरमुळे पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकल गाड्या अतिशय संथ गतीने चालत आहेत. अनेक गाड्या रेल्वे स्थानकांदरम्यान वारंवार थांबत आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या दिवसाची सुरुवातच मनस्तापाने झाली आहे. लोकल उशिराने धावत असल्याने लोकांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर होतो आहे.