मुंबई  : एरव्ही गुन्हेगारीतही आघाडीवर असलेली पश्चिम उपनगरे टाळेबंदीतील नियम पाळण्यात मागे राहिली. सवयीप्रमाणे वांद्रे ते दहिसर दरम्यानच्या उपनगरांमध्ये टाळेबंदीतील विविध निर्बंध सर्वाधिक धुडकावण्यात आले.

टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर मुंबई पेालिसांनी शहरात जमावबंदी, संचारबंदी जारी के ली. प्रवासी वाहतुकीवर बंधने लादली. ही बंधने धुडकावणाऱ्यांसह आरोग्य विभागाने गृह किं वा संस्थात्मक अलगीकरणाबाबत दिलेल्या सूचना अमान्य करणारे, मुखपट्टीचा वापर न करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदवण्यात सुरुवात के ली. मंगळवापर्यंत मुंबईत ७२०९ गुन्हे नोंद के ले गेले. त्यापैकी ३०९९ गुन्हे पश्चिम उपनगरांमधील विविध पोलीस ठाण्यांत नोंद के ले गेले. दक्षिण मुंबईत ९११, मध्य मुंबईत १९८६ तर पूर्व उपनगरात १२१३ गुन्हे नोंद झाल्याची माहिती पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली.

मुंबई पोलीस आयुक्तालयाने जारी के लेल्या आकडेवारीनुसार अलगीकरणाबाबत आरोग्य विभागने दिलेल्या सूचना न मानणाऱ्यांविरोधात संपूर्ण शहरात ५३ गुन्हे नोंदवण्यात आले. त्यापैकी ४८ गुन्हे पश्चिम उपनगरांमध्ये घडले. जमावबंदी आदेश धुडकावून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याचे प्रकारही याच परिसरात जास्त घडले.

अस्वस्थ स्थलांतरित श्रमिकांना अवैधरित्या मुंबईबाहेर काढण्याचे प्रयत्नही या भागातून घडल्याचे मुंबई पोलिसांनी नोंद के लेल्या गुन्ह्य़ांवरून स्पष्ट होते. दक्षिण, मध्य मुंबई किं वा पूर्व उपनगरांच्या तुलनेत पश्चिम उपनगरे अधिक विस्तारलेली आहेत. तेथील लोकसंख्याही अधिक आह. त्याप्रमाणात येथे निर्बंधांची पयमल्ली घडली, असे निरीक्षण एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नोंदवले.