02 March 2021

News Flash

VIDEO: गरीबांनी कसं जगायचं? लॉकडाउनबद्दल मुंबईकरांच्या संमिश्र भावना

करोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन करायचा पण त्यामुळे आर्थिक प्रश्न उभे राहणार त्याचं काय ?

मुंबईसह महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील आकडे चिंता वाढवणारे आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरु झाली असून सर्वसामान्यांच्या मनात या लॉकडाउनने धास्ती निर्माण केली आहे. करोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन करायचा पण त्यामुळे आर्थिक प्रश्न उभे राहणार त्याचं काय ?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने आज मुंबईकरांची लॉकडाउनबद्दलची मत जाणून घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 7:13 pm

Web Title: what mumbaikars think about lockdown dmp 82
Next Stories
1 दुबईवरुन परतताच मित्रासोबत ‘ती’ गेली सिक्रेट गोवा ट्रीपला, पण एक चूक झाली आणि….
2 अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रालयात करोनाचा शिरकाव; आठ कर्मचाऱ्यांना संसर्ग
3 … तर लॉकडाउन टाळता येणार नाही; मुंबईकरांना महापालिका आयुक्तांचा निर्वाणीचा इशारा
Just Now!
X