05 March 2021

News Flash

हस्तमैथुन करणाऱ्या विकृतावर महिलेने फेकले उकळते तेल

महिलेच्या तक्रारीनंतर विकृताला करण्यात आली अटक

संग्रहित

काही दिवसांपूर्वीच एका महिला पत्रकार रिक्षेत बसली असताना रिक्षावाल्याने तिच्यासमोर हस्तमैथुन केल्याचा मुंबईत उघडकीस आला होता. ही घटना मागे पडते ना पडते तोच अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. मात्र या घटनेत ज्या महिलेसमोर एक विकृत माणूस हस्तमैथुन करत होता. त्या महिलेने त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. तसेच महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या विकृताला अटकही केली आहे. विक्रम सिंग असे या विकृताचे नाव आहे. बदलापूरच्या रोहिदास नगर भागात ही घटना घडली.

विक्रम सिंग हा बदलापूर येथील रोहिदास नगर भागात वास्तव्यास आहे. रविवारी तो आपल्या घराशेजारी असलेल्या चाळीजवळ आला. तिथे लघुशंका करू लागला. त्यानंतर चाळीत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या स्वयंपाक घरातून विक्रम सिंगला हटकले. तेव्हा विक्रम सिंग या महिलेला पाहून हस्तमैथुन करू लागला. तसेच तिला अश्लील हावभावही करून दाखवू लागला. विक्रम सिंग याने या महिलेशी वाद घालण्यास सुरूवात केली. तसेच महिलेला शिव्या देत तो अश्लील चाळेही करू लागला.  या विकृत तरूणाला धडा शिकवण्यासाठी या महिलेने तेल उकळवले आणि ते त्याच्या अंगावर फेकले.

या घटनेत या विकृताच्या खांद्याला आणि हाताला भाजले आहे. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी म्हटले आहे.  तसेच या विकृत तरूणाने महिलेने उकळते तेल आपल्या अंगावर फेकल्याने तिच्याविरोधातही तक्रार दिली आहे असेही समजते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:41 pm

Web Title: woman flings hot oil on pervert masturbating outside her window
Next Stories
1 प्रधान सेवकाचा मुखवटा लावणारे इम्रान खान ढोंगी – उद्धव ठाकरे
2 दक्षिण मुंबईतील ४०० जागा सरकारच्या ताब्यात?
3 ‘स्वच्छ भारत’ पथक जाताच फिरते शौचालयही गायब
Just Now!
X