मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या दातार कॉलनी, कांजूरमार्ग पूर्व येथे शुक्रवारी संध्याकाळी राहत्या घरी संगीता सावंत (५६) या महिलेचा मृतदेह  रक्ताच्या थारोळ्यात सापडला. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरटय़ांनी ही हत्या केली असावी, असा अंदाज आहे.
संगीता आपला अविवाहित मुलगा श्यामल याच्यासोबत राहतात. मुलगा कामावरून संध्याकाळी घरी आला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या मानेवर कानाजवळ तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याचे आढळून आले. घराचा दरवाजा जबरदस्तीने तोडण्यात आला नसून घरातील वस्तु अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. काल सावंत यांच्या घरी प्लम्बिंगसाठी दोन इसम आले होते, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.