मालाड येथे अमली पदार्थ विकण्यासाठी येणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट १२ ने अटक केली. त्यात एका महिलेचाही समावेश आहे. त्यांच्याकडून ९ किलो चरस जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १२ लाख रुपये आहे.
मालाड येथे एक महिला आपल्या साथीदारासह अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटला मिळाली होती. त्यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकासह मालाड, एसव्ही रोड येथे सापळा लावून रामप्रित जयस्वाल आणि सोनी महंतो या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ९ किलो चरस जप्त करण्यात आले. रामप्रित मसाल्याचा विक्रेता असून बिहारमधून या दोघांनी हे चरस आणले होते. हे अंमली पदार्थ ते कुणाला देणार होते आणि असे काम ते कधीपासून करत होते त्याचा पोलीस तपास करत आह़े