लेखक अरविंद जगताप यांनी होर्डिंगबाजीवर लिहिलेली फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल होते आहे. या पोस्टमध्ये त्यांनी होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर होर्डिंगमुळे आपल्या देशाची कचराकुंडी झाली आहे असं म्हणत आपला संतापही व्यक्त केला आहे. टिनपाट नेत्यांचे भले मोठे होर्डिंग का लावले जाते तर डांबरी रस्ता केला म्हणून. त्यापेक्षा म्हशीचे फोटो लावा त्यांनी चारा खाल्ला आणि दूधही दिलं आहे. बैलांचे फ्लेक्स लावा, पोळ्याला नैवैद्य दाखवला की तो वर्षभर शेतात राबतो. कुत्र्याचे फोटो लावा, त्याने चोरांना येऊ दिलं नाही.

हे सगळं सोडून सध्या चोरांचेच फोटो लावण्याची फॅशन आली आहे गावोगाव. तुम्ही म्हणाल सगळेच नेते वाईट नसतात. मी म्हणतो जो चांगला नेता आहे तो होर्डिंग लावणाऱ्याच्या नेत्याच्या कानाखाली मारेल कारण होर्डिंगमुळे देशाची कचराकुंडी होत आली आहे.अशी पोस्ट लिहून अरविंद जगताप यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. ही पोस्ट ४०० पेक्षा जास्त लोकांनी शेअर केली आहे. तर या पोस्टला दीड हजाराहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. होर्डिंग्जबाबत जे वाटते ते त्यांनी रोखठोकपणे पोस्ट केले आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरलही होते आहे.