मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमन याला टाडा न्यायालयाने काढलेल्या ‘डेथ वॉरन्ट’नुसार येथील कारागृह प्रशासनाने त्याच्या फाशीची तयारी पूर्ण केली असून उशिरा रात्रीपर्यंत कोणतीही महत्त्वपूर्ण घडामोड घडली नाही तर आज, गुरुवारी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गुरुवारी त्याचा वाढदिवस आहे.
दरम्यान, फाशीच्या संदर्भातील अनिश्चितता संपल्यानंतर कारागृह प्रशासनाने त्यांच्या पुढील प्रक्रियेला गती दिली आहे. फाशीच्या वेळी उपस्थित राहण्यासाठी याकूबच्या तीन नातेवाईंकांना परवानगी देण्यात आल्याचे वृत्त आहे. सध्या त्याचे दोन भाऊ येथे आले आहेत. सायंकाळी त्याची पत्नी येथे येऊन पोहोचली. यापैकी कोणाला हजर राहण्याची परवानगी दिली जात,े याविषयी माहिती मिळू शकली नाही.
याकूबला ३० जुलै रोजी फासावर लटकविले जाणार असल्याचे वृत्त बाहेर आल्यावर यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून घडामोडींना कमालीचा वेग आला होता. सर्वोच्च न्यायालयाने तसेच राज्यपालांनी याकूबची याचिका व दयेचा अर्ज फेटाळून लावल्यावर त्याच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर प्रशासनाने पुढील तयारी सुरू केली आहे. फाशी देण्यासाठी पुण्याहून प्रशिक्षित कर्मचारी बोलवण्यात आले आहे. कारागृहात आवश्यक ती सुरक्षेची तयारी करण्यात आली असून प्रत्येक गोष्टीकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी याकूबची मानसिक व शारीरिक तपासणी करण्यात आली. त्यात त्याची प्रकृती उत्तम असल्याचे दिसून आले.  दरम्यान, पोलीस प्रशासनाने तुरुंग परिसरात बुधवारी सायंकाळी कलम १४४ लागू केले आहे. तुरुंगाच्या आजूबाजूचे सर्व रस्ते मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या परिसरात कोणालाही फिरण्यास मनाई करण्यात आला आहे. फाशीच्या वेळेच्या संदर्भात अधिकारी काहीही बोलण्यास तयार नव्हते.
याकूबचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देणार
फासावर लटकवल्यानंतर याकूब मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देणार असल्याचे समजते. मेमनचे दोन भाऊ व त्याची पत्नी हे तिघेही फाशीच्या वेळी उपस्थित राहणार असल्याचे कळते. दरम्यान, नागपूर कारागृहात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच याकूबचा वाढदिवस आहे.  याकूबला फाशी देण्यासाठी पुण्याहून प्रशिक्षित कर्मचारी बोलावण्यात आले आहेत. कारागृहात आवश्यक ती सुरक्षेची तयारी करण्यात आली असून प्रत्येक गोष्टीकडे अतिशय काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी याकूबची मानसिक व शारीरिक तपासणी करण्यात आली. त्यात त्याची प्रकृती उत्तम असल्याचे दिसून आले. त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करावा, अशी त्यांच्या भावांची मागणी होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या भीतीने प्रशासनाने यासाठी परवानगी नाकारली होती. पण शांततेने दफनविधीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर यास संमती देण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार याकूबच्या तीन नातेवाईकांना कारागृहात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने तुरुंग परिसरात बुधवारी सायंकाळी कलम १४४ लागू केले आहे. तुरुंगाच्या आजूबाजूचे सर्व रस्ते मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या परिसरात कोणालाही फिरण्यास मनाई करण्यात आली  आहे.

कायद्यानुसार पुढील प्रकिया पार पडेल. सर्वोच्च आणि टाडा न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकार पावले टाकणार आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

याकूबला काँग्रेस सरकारने आश्वासने दिल्याने तो शरण आला होता. काँग्रेसने अगदी शिखांच्या दंगलीपासून गुजरात दंगल, मुंबईतील दंगली आदींचे राजकारणच केले.
– इम्प्तियाझ जलील,
आमदार, एमआयएम

याकूबच्या संदर्भात बुधवारी जो निर्णय झाला, तो मला मान्य आहे. अल्ला व न्यायालयावर माझा विश्वास आहे.
– सुलेमान मेमन, याकूबचा भाऊ