News Flash

‘यशराज फिल्म्स’चे पैसे ऑनलाइन भामटय़ांच्या खात्यात वळते

मगनलाल कंपनीचे ईमेल हॅक करून ही फसवणूक करण्यात आली.

‘यशराज फिल्म्स’चे पैसे ऑनलाइन भामटय़ांच्या खात्यात वळते
(संग्रहित छायाचित्र)

जयेश शिरसाट

चित्रपटांना कपडे पुरवणाऱ्या कंपनीचे ईमेल हॅक

चित्रपटांसाठी तयार कपडे भाडय़ाने देणाऱ्या मगनलाल ड्रेसवाला कंपनीसह यशराज फिल्म्सला पावणेदोन लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला जुहू पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. मगनलाल कंपनीचे ईमेल हॅक करून ही फसवणूक करण्यात आली.

जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मगनलाल कंपनीने यशराज फिल्म्सला ईमेलद्वारे कपडय़ांचे एक लाख ७५ हजार रुपयांचे देयक पाठवले. सोबत पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेचा खाते क्रमांक नमूद केला. ईमेल पाठवून बरेच दिवस झाले तरी पैसे खात्यात आले नाहीत म्हणून कंपनीने यशराज फिल्म्सकडे विचारणा केली. यशराजने पैसे दिल्याचे सांगितले. मगनलाल कंपनीच्या अधिकृत ईमेलआयडीवरून यशराजकडे आलेल्या ईमेलमध्ये एचएसबीसी बँक खात्याचे तपशील होते. त्यावरच यशराजने ही रक्कम वळती केल्याचे उघड झाले. पोलिसांनी एचएसबीसीच्या संबंधित खातेदाराला शाखेत बोलावून ताब्यात घेतले. रवी दुबे आणि जितेंद्र राठोड अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी ईमेल हॅक करून हा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2019 2:00 am

Web Title: yash raj films money turns into online bank accounts
Next Stories
1 मागासलेपणामुळेच मराठा समाजाला आरक्षण
2 परीक्षेचे काम असलेल्या शिक्षकांना दीर्घकाळ निवडणूक जबाबदारी नको!
3 मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसचे रणशिंग
Just Now!
X